आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पंढरपूरच्या सप्ताहाची दहीहंडी फोडून सांगता..

पंढरपूरच्या सप्ताहाची दहीहंडी फोडून सांगता..

प्रतिनिधी -समीर गोरडे

माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने पंढरपूर येथील श्री पांडुरंग रुक्मिणी मंदिराजवळील तुकाराम भवन येथे मंगळवार (ता. १२ )ते मंगळवार (ता . १९ )असा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला .या सप्ताहाची सांगतासंगीत अलंकार . ह भ प भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे /गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली तर या सप्ताहाचे संयोजक पत्रकार ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आली असल्याचे या सप्ताहाचे संयोजक जामेळा दिंडी क्रमांक चे उपाध्यक्ष अवसरी खुर्द ता आं .बेगाव येथील बबनराव मारुती राजगुरू व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

अध्यात्माला भक्तीची सांगड घातली पाहिजे व विज्ञानाला अध्यात्माची सांगड घातली पाहिजे तर सामान्य माणसाचे जीवन जगणे सुसह्य होते असे प्रतिपादन संगीत अलंकार सौ भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे / गायकवाड यांनी काल्याच्या कीर्तनात मांडले.

या सप्ताहामध्ये पहाटे काकड आरती भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते तीन ह भ प बाळासाहेब महाराज गायकवाड (वळती ता . आंबे गाव ) यांची श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी प्रवचन हरिपाठ व रात्री साडेसात ते नऊ वाजता वारकरी सांप्रदायिक श्री हरी कीर्तने संपन्न झाली या सप्ताहात संजीवनीताई भावेश मंडलिक (लांडेवाडी )प्राचार्य डॉ पांडुरंग निवृत्ती महाराज गायकवाड ( मंचर ) ह भ प किशोर महाराज उगले (बीड) धोंडीभाऊ महाराज शिंदे गुरुजी (अवसरी खुर्द ) हभप दिपक महाराज टेंबेकर (अवसरी खुर्द ) ह भ प श्रीकांत महाराज बेल्हेकर गणेशवाडी (ता. नेवासा )ह भ प अर्जुन महाराज पंचराज (लोणी )ह भ प पंढरीनाथ तांबे सर (अवसरी खुर्द )यांची प्रवचन रूपाने सेवा झाली .तर या सप्ताहात ह . भ .प . सिद्धीताई विनायक गावडे (आदर्शगाव गावडेवाडी )ह भ प दीनानाथ महाराज शिंदे (आदर्शगाव गावडेवाडी ) ह भ प अशोक महाराज हाकाळे (गेवराई बीड ) ह भ प दत्तात्रय महाराज रुकारी (कोलारवाडी ता . आंबेगाव ) ह भ प नामदेव महाराज वाळके वेळेश्वर मंदिर संस्थान ( भावडी )ह .भ. प . आदिनाथ महाराज जुन्नरकर ( खडकी पिंपळगाव ) यांची वारकरी सांप्रदायिक श्रीहरी कीर्तने संपन्न झाली आहेत या सप्ताहाची सांगता ह . भ.प .संगीत अलंकार सौ भीमाताई ज्ञानेश्वर लोंढे (वारू ता . मावळ ) यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजता काल्याचे किर्तन होऊन संयोजक पत्रकार ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्तेदहीहंडी फोडून या सप्ताहाची सांगता करण्यात आली सप्ताहाला राज्यभरातून भाविकांची गर्दी झाली होती शेकडोभाविकांनी या श्रवण सुखाचा आनंद घेतला असल्याचे अजामेळा दिंडी क्रमांक २६ च्या वतीने व संयोजक पत्रकार ह भ प मधुकर महाराज गायकवाड यांच्या वतीने सांगाव्यात आले .

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.