आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ उत्साहात संपन्न!!

आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ उत्साहात संपन्न!!

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत भारतमाता व संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा – कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या समारंभ कार्यक्रम प्रसंगी आत्मा मालिक ध्यानपिठाच्या संत भारतमाता, कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, वृषालीताई जाधव, स्थानिक विश्वस्त प्रवीण मोरे ,प्राचार्य पंकज बडगुजर सर व उपप्राचार्य सारंगधर बावस्कर सर वसतिगृह व्यवस्थापक शरद ब्राम्हणे सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कनकोशे सर यांनी तसेच सूत्रसंचालन सोमनाथ कांबळे सर व आभारप्रदर्शन मोहन साबळे सर यांनी केले.

यावेळी समारंभ प्रसंगी अंजली राव, प्रतिक बोस ,पूनम डोके , कृष्णा चौधरी, अय्याज शेख, भूमिका भुसरा, भावेश भुसारा, यश चौधरी, रोशनी ठाकरे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला.

यावेळी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू म्हणून स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा विश्वस्त प्रवीण मोरे यांच्या हस्ते कार्याध्यक्ष उमेश जाधव यांना देण्यात आली. वसतिगृह व्यवस्थापक यांना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली , तर प्राचार्य बडगुजर सरांना वारली पेंटिंग भेट देण्यात आली. तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाही वसतिगृहाला सप्रेम भेट देण्यात आल्या.

या प्रसंगी संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी इयत्ता दहावी नंतरच पुढील जीवनात होणार बद्दल आयुष्यात शिक्षण व त्याला मिळणारी अध्यत्मिकतेची जोड आयुष्यभरासाठी मोलाची ठरते.
या कार्यक्रमाचा समरोप संगीत शिक्षक सुयोग खंडागळे सर व लक्ष्मण साळुंखे सर यांच्या संगीत भजन याद्वारे झाला.
या निरोप समारंभाला विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

या वृत्ताबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, विश्वस्त तथा कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब तसेच समस्त विश्वस्त मंडळ यांनी इयत्ता दहावी विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.