आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडिया लि.कडून जि.प.प्राथमिक शाळा निमणबेटला संगणक संच प्रदान!!

कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडिया लि.कडून जि.प.प्राथमिक शाळा निमणबेटला संगणक संच प्रदान!!

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ता. ५ : शेतकरी बांधवांच्या मुलांना शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या हेतूने कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडिया लि. कडून जि.प.प्राथमिक शाळा निमणबेटला संगणक संच प्रदान करण्यात आला. ढोबळे ऍग्रो सर्विसेस चे संचालक श्री. पार्थ ढोबळे यांच्या पुढाकारातून संगणक संच शाळेस भेट देण्यात आला.

याप्रसंगी कंपनीचे पुणे एरिया मॅनेजर श्री. जगन जाधव साहेब, नारायणगाव विभाग मॅनेजर श्री. भुतेकर साहेब, सरपंच सौ. श्वेता ढोबळे, उपसरपंच श्री. नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या सौ. लता ढोबळे, सौ.रोहिणी देवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश ढोबळे, उपाध्यक्ष सौ. सुरेखा ढोबळे, शाळेतील शिक्षिका सौ. चंद्रप्रभा अरगडे, सौ. अर्चना ढोबळे, श्री. अशोक ढोबळे, किशोर ढोबळे, सौ . श्रद्धा ढोबळे, शिल्पा पुंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. जाधव साहेब यांनी आपल्या मनोगतातून संचाचा वापर विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. रामदास उंडे सर यांनी केले. आभार श्री. किरण ढोबळे सर यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.