आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वृषाली महिला सामाजिक संस्थेचा महिला आनंद मेळावा जल्लोषात संपन्न!!

वृषाली महिला सामाजिक संस्थेचा महिला आनंद मेळावा जल्लोषात संपन्न!!

वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात तसेच जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी वृषाली महिला सामाजिक संस्थेचा होणारा महिला आनंद मेळावा यावर्षी नुकताच शहापुरातील वैश्य समाज हॉल येथे महिलांच्या प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. हा मेळावा म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी महिलांसाठी एक दिवस सर्व विसरून मनसोक्त आनंद साजरा करण्याचा एक हक्काचा दिवस!!या मेळाव्यात आपल्या ग्रामीण भागातील महिला ज्यांना कधी स्टेजवर जाण्याची संधी मिळत नाही अशा महिलांना प्रोत्साहित करून त्यांची सामूहिक नृत्य सादर केली जातात.यावेळी आई व मुलगी अशीही संकल्पना राबवली त्यास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, सौ प्रियांका बरोरा, कुणबी समाज संघाचे श्री किशोर कुडव, श्री राजूशेट भेरे, दत्ता पाटील, मनोहर सासे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, अपर्णाताई खाडे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रश्मी निमसे, तालुका संघटक गुलाब भेरे, सौ शीतल गुजरे, सौ.अश्विनी वारघडे, पूनम चंदे, नगरसेविका नीलम चंदे, सौ सविता चंदे, सौ ज्योती शेखावत, सौ विजया चव्हाण, भाजपच्या सौ रंजना उघडा, राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा सौ कल्पना तारमले, सौ कमल निमसे , सौ कमल भोईर, नगरसेविका सौ रजनी शिंदे, सौ वैदेही नार्वेकर, सौ विमल पष्टे, श्रीमती पुष्पा ठाकूर, सौ मनाली भेरे सौ वनिता भोईर, संस्थेच्या सौ वृषाली पाटील, सौ संगिता सोनारे, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मानसी घरत यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.