आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता. आंबेगाव) च्या आखाड्यात पै.निखील वाघचा झंझावती थरार !!!

धामणी(ता. आंबेगाव) च्या आखाड्यात पै.निखील वाघचा झंझावती थरार !!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या यात्रेच्या दुसर्‍या दिवशीच्या (रविवारी) कुस्त्याच्या आखाड्यात पहाडदर्‍याचा पहिलवान निखिल वाघने यात्रेतील कुस्तीशौकीनाच्या झंझावती वातावरणात खरी आणि चितपट कुस्ती करुन उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले असल्याचे पाहावयास मिळाले.

धामणीच्या कुस्त्याच्या आखाड्यात शिरुर,खेड,आंबेगाव, हवेली,मुळशी तालुक्यातील नामवंत तालमीतील प्रसिध्द पहिलवान मंडळीनी आवर्जुन उपस्थित राहून कुस्तीक्षेत्रातील आपली चपळता,डाव,प्रतिडाव चमकदारपणे दाखवून चितपट कुस्त्याचा थरार दाखवून कुस्त्याच्या आखाड्यात जल्लौषी वातावरण तयार केले.

आखाड्यातील शेवटच्या मानाच्या कुस्तीत पै.निखिल वाघने झंझावती व चपळाईचा खेळ दाखवून व चितपट कुस्ती करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.धामणी,शिरदाळे,पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती ग्रामस्थांच्या वतीने पै. निखील वाघ यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

पै.निखिल वाघ हा पहाडदर्‍याचे जुन्या जमान्यातील नामवंत पहिलवान सहादू वाघ व सखाराम वाघ,विष्णू वाघ,राधू वाघ यांचा पणतू आहे.तर पहाडदर्‍याचे सरपंच श्री मच्छिद्रनाथ शिवराम वाघ यांचा मुलगा आहे. तो सध्या भोसरी येथील आमदार महेश लांडगे स्पोर्टस फाऊंडेशनच्या मँटवरील व मातीच्या आखाड्यातील कुस्ती केंद्रात सराव करत आहे.

गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी ७५वर्षावरील वजनाच्या गटातील कुस्ती स्पर्धेसाठी त्याची पुणे जिल्ह्यातून निवड झालेली होती.पै.निखिल वाघ यांने धामणी नंतर पोंदेवाडी (ता.आंबेगांव) येथील श्री गडदादेवीच्या यात्रेतील कुस्त्याच्या आखाड्यात चितपट कुस्ती केली असल्याचे पोंदेवाडी ग्रामस्थाच्या वतीने सांगण्यात आले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.