प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे(पारगाव)येथे पल्स पोलिओ लसीकरण उत्साहात संपन्न!!
प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे(पारगाव)येथे पल्स पोलिओ लसीकरण उत्साहात संपन्न!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
आंबेगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यातआली. यावेळी बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्याचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रोहिणी भोर, डॉ. श्रध्दा पाटिल,गुरव सिस्टर,माळी सिस्टर,आशावर्कर,अंगणवाडी
सेविका यांच्या मार्फत लसिकरण करण्यात आले.
आंबेगाव तालुक्यातील सातशे पन्नास कर्मचाऱ्यांमार्फत दोनशे सत्तेचाळीस बुथवर ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले.
बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बूथ स्थापन करण्यात आले होते. नागरिकांनी जवळच्या पोलिओ बूथवर आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बाळाला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोलिओ डोस पाजण्यात आले.