आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण अतिशय उत्साहात संपन्न!!

आंबेगाव तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण अतिशय उत्साहात संपन्न!!

प्रतिनिधी -समीर गोरडे (शिंगवे पारगाव)

आंबेगाव तालुक्यात रविवारी (दि.३) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आले आहे. या दिवशी जवळपास अठरा हजार सहाशे बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार पवार यांनी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातील सातशे पन्नास कर्मचाऱ्यांमार्फत दोनशे सत्तेचाळीस बुथवर तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुका आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी तसेच टोलनाका व बसस्थानक येथे पोलिओ बूथ स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी जवळच्या पोलिओ बूथवर आपल्या ० ते ५ वर्षे वयाच्या बाळाला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पोलिओ डोस नक्की पाजावा, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांनी केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.