आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

स्मार्ट अंतर्गत कंपनी संचालकांचे नाशिक येथे अभ्यास दौ-याचे आयोजन!!

स्मार्ट अंतर्गत कंपनी संचालकांचे नाशिक येथे अभ्यास दौ-याचे आयोजन!!

प्रतिनिधी -समीर गोरडे (शिंगवे पारगाव)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट च्या माध्यमातून विजय हिरेमठ प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर , शिरुर या तालुक्यातील स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतकरी सभासदांची तीन दिवसीय राज्यांतर्गत सहल आयोजन करण्यात आले.

कांदा व लसुण संशोधन केंद्र येथे डॉ. राजीव काळे यांनी कांदा व लसणाच्या संशोधित केलेल्या जाती विषयी मार्गदर्शन केले.डाँ.मोहीणी भट यांनी कांदा व लसुण प्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले. दरम्यान नाशिक येथे शेतकऱ्यांना एन एच आर.डी. एफ चितेगाव फार्म नाशिक येथे शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने कांदा लागवड याविषयी डॉ ए.के.सिंग संचालक यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच निफाड मधील उगाव याठिकाणी ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या भाजीपाला रोपवाटिकाला भेट देऊन कंपनीचे फार मॅनेजर योगेश होन यांनी भाजीपाला रोपांची निर्मिती याविषयी सविस्तर अशी माहिती दिली.

एकूणच सर्व शेतकऱ्यांना तीन दिवसांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना भविष्यामध्ये त्यांच्या ग्रामीण पातळीवरती तेथील पिकांची परिस्थिती पाहता कशा प्रकारचे उद्योग व्यवसाय करता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .सदरील सहली दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे कांदा विक्रि व्यवस्थेविषयी शेतक-यांनी माहिती घेतली सहलीचे नियोजन स्मार्टच्या ज्योती भालके व आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडिभाऊ पाबळे यांनी केले .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.