आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ महाविद्यालय देतंय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे!!

समर्थ महाविद्यालय देतंय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व समर्थ लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियाना अंतर्गत संकुलातील विद्यार्थीनींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानामध्ये संकुलातील ६२१ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण काळाची गरज आहे.संकुलामध्ये महिला सबलीकरण,व्यक्तिमत्व विकास,स्वास्थ्य,महिला उद्यमशीलता,स्त्री-पुरुष समानता यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बौद्धिक,शारीरिक,मानसिक व भावनिक इ.स्तरावर विद्यार्थिनींना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो असे यावेळी ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य वैशालीताई आहेर म्हणाल्या.यावेळी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनी मुलींना स्वसंरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या डावपेचाची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.तसेच त्यांच्या सोबत प्रशिक्षक ईशिता काकडे,तन्वी रोकडे व तनुजा भद्रीगे उपस्थित होत्या.त्यांनी आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थिनींनी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्या हाताच्या साह्याने,पायाच्या साहाय्याने किंवा वेगवेगळ्या शारीरिक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिकांच्या साह्याने कशाप्रकारे आत्मसंरक्षण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवले आणि विद्यार्थिनींनी सहभाग दर्शवला.

ईशिता काकडे हिने रायफल शूटिंग चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असल्याने यावेळी नेमबाजी करताना मनाची एकाग्रता किती महत्त्वाची असते हे तिने शंभर ते दीडशे फुटावरून शूटिंग चे प्रात्यक्षिक करून दाखवले.यावेळी प्रशिक्षकांनी लाठी काठी चे प्रयोग,तलवारबाजी,दांडपट्टा कसा चालवायचा याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनीही या सर्व प्रशिक्षणामध्ये उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी चे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,बी सी एस चे प्रा.गणेश बोरचटे,एम बी ए चे डॉ.महेश भास्कर,प्रा.शशिकांत ताजणे,डॉ.रुस्तुम दराडे,लॉ कॉलेज च्या प्रा.पूनम वाघ,उपप्राचार्य प्रा.प्रकाश कडलग,प्रा. दिनेश जाधव,प्रा.निलेश गावडे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा.अमोल भोर यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.