आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान शाखा शिंगवे विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के!!

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान शाखा शिंगवे विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के!!

प्रतिनिधी -शिंगवे पारगाव समीर गोरडे

शिंगवे (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इंटरमिनिएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी इयत्ता नववी व दहावी वर्गातील 103 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य डी एन खाडे यांनी दिली.

इंटरमिनिएट परीक्षेत अ गटात २०, ब गटात २२ व क गटात १८ विद्यार्थी असे एकूण ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत अ गटात १३, ब गटात १० आणि क गटात २० विद्यार्थी असे एकूण ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दोन्ही प्रकारात एकूण १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे, सर्व उत्तीर्ण विद्यार्थांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्याचा लाभ होणार आहे यामध्ये अ गटात उत्तीर्ण झालेल्यांना ७ मार्क,ब गटासाठी ५ मार्क व क गटातील विद्यार्थांना ३ मार्क मिळणार आहेत.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका चंद्रकला भूमकर यांनी मार्गदर्शन केले तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिंगवे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.