ताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावात दणक्यात साजरा झाला हळदी कुंकू समारंभ!

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावात दणक्यात साजरा झाला हळदी कुंकू समारंभ!

● सौ. उषा संजय भागडे ठरल्या स्कुटी आणि पैठणीच्या मानकरी
● द्वितीय क्रमांक : सौ भावना संदीप मावकर (फ्रीज)
● तृतीय क्रमांक: सौ. सोनाली अनिकेत बिबवे (वॉशिंग मशीन)
——–
मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवसंकुलामध्ये शिरूर लोकसभेतील महिला भगिनींसाठी आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साह व आनंदात संपन्न झाला.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री व व्हॉइस आर्टिस्ट मेघना एरंडे व त्यांच्या टीमने घेतलेले विविध मनोरंजनात्मक खेळ तसेच श्रावणी एंटरटेनमेंट यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये महिलांनी टंग टूट्विस्टर, तळ्यात मळ्यात, पासिंग बॉल, संगीत खुर्ची या खेळांचा आनंद घेतला. विजयी भाग्यवान महिलांना स्कुटी, पैठणी, फ्रीज, मिक्सर व 25 महिलांना आकर्षक भेटवस्तू तर
दहा भाग्यवान महिलांना सोन्याच्या नथी सप्रेम भेट देण्यात आल्या. सहा हजार पेक्षा जास्त महिलांनी हळदी कुंकवाच्या वाणाबरोबरच स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

यावेळी खा.आढळराव पाटील यांच्या समवेत प्रसिद्ध सिनेअभिनेते रवी काळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, युवासेना विस्तारक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे प्रवीण थोरात, तालुकाप्रमुख संतोष डोके, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक समिती उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, मंचर मा.सरपंच मीराताई बाणखेले, उपजिल्हा संघटक महिला आघाडी मालती थोरात, सौ सुषमा गिरे, मा.पंचायत समिती सदस्य सौ.शितल तोडकर, डॉ. कल्पना पोकळे, सौ.अलका घोडेकर, ,
सौ. स्वाती घुले, लांडेवाडी सरपंच सौ.संगीता शेवाळे, मा.सरपंच प्रीती थोरात, सरपंच सुजाता चासकर, सौ.आशाताई बांगर उपस्थित होत्या.

भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. कल्पना आढळराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाचर्णे यांनी केले. संस्थेच्या प्रशासन अधिकारी प्रा. शामल चौधरी, शिवाजीराव पाटील मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर विनोद सायनकर, बी. एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय चौधरी, डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. सुनील गावशेते, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन, उपप्राचार्या रजनी बाणखेले, श्री शिवाजीराव आढळराव
पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू आढळराव, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.