मांजरी खुर्द येथे आरीवर्क प्रशिक्षण शिबिर संपन्न!!

मांजरी खुर्द येथे आरीवर्क प्रशिक्षण शिबिर संपन्न!!
प्रतिनिधी- समीर गोरडे
मांजरी खुर्द ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकशे तीस महिलांना आरीवर्क प्रशिक्षण देण्यात आले.सुयश स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र संस्थापिका मिनल मोढवे आणि अध्यक्षा अभिलाषा मोढवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरीवर्क प्रशिक्षण देण्यात आले,यामध्ये महिलांना ब्लाऊज वर विविध प्रकारच्या डिझाईन तयार करण्यात शिक्षण देऊन महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली तसेच या प्रशिक्षणामुळे महिला स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे कमवुन आपल्या कुटुंबाचा आर्थिक खर्च भागविण्यासाठी मदत होईल असे मांजरी खुर्द गावचे सरपंच रुपेश उंद्रे यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र बुलेटिन न्युज संपादक मनोज तळेकर, पत्रकार समीर गोरडे, माऊली पाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी मांजरी खुर्द गावचे सरपंच रूपेशदादा उंद्रे , उपसरपंच अशोकदादा माने , ग्रामपंचायत सदस्य कीर्तीताई उंद्रे,मनिषाताई ढेरे, ग्रामविकास अधिकारी मयुर सर उगले, उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी संस्था सचिव सागरदादा नवले , राजगुरुनगर सातकरस्थळ उपसरपंच सौ. धनश्रीताई सांडभोर ,पालवी सामाजिक संस्था अध्यक्षा ऍडव्होकेट सुरेखाताई कड,
पालवी सामाजिक संस्था सचिव ज्ञानेश्वर कड,महिला मार्गदर्शक भोई सर ,गावडे सर,स्वप्न साकार महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली विक्रम वाघमोडे , होममिनिस्टर आयोजक Adv. शुभम घाडगे , सत्यवान सहाने इ. मान्यवर उपस्थित होते.