सावली फाउंडेशन चांडोली बुद्रुक, मित्र परीवार यांच्या माध्यमातून शहीद जवान प्रसाद थोरात व शहीद जवान सुधीर थोरात यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महारक्तदान शिबिर संपन्न!!

सावली फाउंडेशन चांडोली बुद्रुक, मित्र परीवार यांच्या माध्यमातून शहीद जवान प्रसाद थोरात व शहीद जवान सुधीर थोरात यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महारक्तदान शिबिर संपन्न!!
सावली फाउंडेशन चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) व मित्र परीवार यांच्या माध्यमातून शहीद जवान प्रसाद थोरात व शहीद जवान सुधीर थोरात यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महारक्तदान शिबिर संपन्न झाले.
शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वा.श्रीमती सारिका प्रसाद थोरात व श्रीमती अश्विनी सुधीर थोरात यांनी प्रतिमा पूजन केले.यावेळी फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री मोहनशेठ शहाजी थोरात (कमलराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुणे) तसेच सावली फाउंडेशन चे आधारस्तंभ महेशभाऊ दत्तात्रय वाघ, श्री.मंगेशभाऊ काळूराम जाधव उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी फाऊंडेशनचे संस्थापक BSF जवान श्री.पंकज दिलीप गाडेकर यांच्या नियोजनात हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरात एकूण 254 रक्तदात्यानी रक्तदान केले.
गोरक्ष थोरात,रुपेश थोरात,किरण वैराळ,कमलेश थोरात,कान्होबा इंदोरे,नरेन थोरात,विजय शिंदे,गणेश अभंग,कल्पेश गुंजाळ,विनायक जाधव,नवनाथ थोरात,ओंकार गाडेकर,आर्यन थोरात, ज्ञानेश्वर गोरे,सावली फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.या वेळी चांडोली बुद्रुक ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.