आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

स्वर्गीय वंदनीय,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना धामणी(लोणी) ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन!!

स्वर्गीय वंदनीय,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना धामणी(लोणी) ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन!!

हिंदुहृदयसम्राट,वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धामणी(लोणी ) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत चौकात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी बोलताना मा. सरपंच सागर जाधव यांनी सांगितले की वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते आयोध्ये मध्ये राम मंदीर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते काल अयोध्या नगरीमध्ये श्री प्रभु रामांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या करण्यात आली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न काल पुर्ण झाली आहे याचा समस्त शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० %समाजकारण व २०%राजकारण हे सुत्र शिवसेनेला घालुन दिले आहे आजही शिवसैनिक त्या सत्राच्या आधारे काम करत आहे.

त्याप्रसंगी मा.सरपंच अंकुश भूमकर, कारसेवक सुभाष नेते जाधव, मा.सरपंच सागर जाधव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग ससाणे,केरभाऊ बढेकर,ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, संकेत वायकर, सुहास रोडे ,अमोल जाधव,राहुल करंजखेले,राहुल जाधव , रोहित भुमकर,संतोष कुरकुटे,खुशाल जाधव,अमर रोडे , सतिश देशमुख,सचिन जाधव,गणेश जाधव,बाजीराव भुमकर,बाबाजी करंजखेले,दत्ता रोडे,संकेत जगदाळे,गौरव पवार,चंद्रकांत जाधव,नारायण बोऱ्हाडे,एकनाथ जाधव मोठ्या संख्येने धामणी ग्रामस्थ उपस्थित होते .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.