आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावाने केली राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी!!संपूर्ण गाव उद्यापासून करणार बेमुदत साखळी उपोषण!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी)गावाने केली राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी!! संपूर्ण गाव उद्यापासून करणार बेमुदत साखळी उपोषण!!

मराठा क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला केलेल्या अवाहनानुसार आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावाने राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी केली असून संपूर्ण गाव उद्यापासून बेमुदत साखळी उपोषण करणार आहे !!

जोपर्यंत महाराष्ट्र सरकार मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार पिंपळगाव(खडकी) येथील ग्रामस्थांनी केला आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून ह्या आंदोलनात शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधव, तरुण वर्ग यांसह मोठ्या संख्येने मराठा बांधव व महिला भगिनी सहभागी होणार आहेत.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.