आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु!!आंदोलनात शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधव, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग यांसह मोठ्या संख्येने सहभागी!!

पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु!!

आंदोलनात शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधव, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग यांसह मोठ्या संख्येने सहभागी!!

मराठा क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला केलेल्या अवाहनानुसार आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावात राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी केली असून संपूर्ण गाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत साखळी उपोषण करत आहे.

ह्या आंदोलनात शालेय विद्यार्थी, शेतकरी बांधव, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग यांसह मोठ्या संख्येने मराठा बांधव व महिला भगिनी सहभागी झाले आहेत. तसेच गावातील सर्व सामाजिक संस्था, व्यावसायिक यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी पिंपळगाव(खडकी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने योगेश बांगर यांनी रोखठोक शब्दात भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा आता पेटून उठला आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. आमच्या गावातील ग्रामस्थांनी राजकीय सभा, मेळावे व राजकीय नेत्यांसोबत फिरणार नाही असे वचन घेतले असून जो कोणी मराठा जात बाजूला सारून पक्ष व नेता मोठा समजत असेल त्यांना मराठा समाज खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी स्वप्निल बांगर, किरण पोखरकर, श्रीकांत पोखरकर, सरोज बांगर, निलेश पोखरकर, निखिल पोखरकर, राहुल पोखरकर, ओंकार पोखरकर, हेमंत बांगर, संग्राम बांगर, धनेश पोखरकर, जयदीप राक्षे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.