आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
धामणी (ता.आंबेगाव) येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात!!
धामणी,शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा!!
धामणी (ता.आंबेगाव) येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात!!
धामणी,शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा!!
आज धामणी येथे सकल मराठा समाज्याच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी “मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील” यांनी उभा केलेल्या लढ्यात धामणी,शिरदाळे,पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला असून आज पासून साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे.
आज सकाळी ९ वा.जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या आंदोलनाला शांततेच्या मार्गाने सुरवात करण्यात आली. यावेळी अनेक मराठा बांधव उपस्थित होते.