कृषीदुतानी लांडेवाडी(ता.आंबेगाव)येथे आयोजित केले शेतकऱ्यांसाठी माहिती सत्र!!

कृषीदुतानी लांडेवाडी(ता.आंबेगाव)येथे आयोजित केले शेतकऱ्यांसाठी माहिती सत्र!!
लांडेवाडी येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना पद्मभूषण वसंत दादा पाटील या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन करण्यात आले होते व या माहिती सत्राचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला
माहिती सत्रा मध्ये मध्ये कृषीपर वेगवेगळ्या विषयांवर तक्ते तसेच लाईव्ह वेगवेगळ्या प्रकारचे कीटक व तसेच विविध रोगांचे व वेगवेगळ्या तणांचे नमुने तेथे ठेवण्यात आले होते .यावेळी कृषीदूत शुभम यादव ,ऋषिकेश शितोळे, आदित्य वाडीभस्मे, ऋषिकेश सोनावळे ,हर्ष बोरचाटे यांनी शेतकऱ्यांनी विचारलेला प प्रश्नांबद्दल माहिती सत्रामध्ये माहिती मार्गदर्शन केले.
यावेळी सी बी आर आय टी चे मधमाशी पालन चे मास्टर ट्रेनर मास्टर ट्रेनर श्री डुंबरे सर यांनी उपस्थिती दाखवली . यावेळी लांडेवाडी सरपंच सौ.संगीता शेवाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृषी दूतांनी त्यांचे आभार मानले.