ताज्या घडामोडीसामाजिक

धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबाच्या पाऊतके मंदिराचे जिर्णोध्दारासाठी श्री.सिध्दार्थ मित्र मंडळ मुंबई (धामणीकर मंडळी) यांच्याकडून ४१०००/- ची देणगी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबाच्या पाऊतके मंदिराचे जिर्णोध्दारासाठी श्री.सिध्दार्थ मित्र मंडळ मुंबई (धामणीकर मंडळी) यांच्याकडून ४१०००/- ची देणगी!!

धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिराच्या आवारातील (मुख्य प्रवेश द्वाराच्या दिपमाळेसमोरील)पाऊतके मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी चंपाषष्ठीला मंदिराचे आवारात श्री.सिध्दार्थ मित्र मंडळ मुंबई (धामणीकर मंडळी) यांच्या वतीने रु ४१०००/-ची रोख देणगी खंडोबा मंदिर जिर्णोध्दार समितीकडे जमा करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ आणि देवस्थानाचे सेवेकरी भगत तांबे,वाघे,वीर मंडळीनी दिली.

पुरातन पाऊतके मंदिरात नुकताच ग्रँनाईटचे सिंहासन करण्यात येऊन व गाभार्‍यात नवीन फरशी बसवून आकर्षक जिर्णोध्दार करण्यात आलेला आहे. मंदिरातील श्री खंडोबा व बाणाई मूर्तीना वज्रलेप करुन व पूर्णपणे झिजून खराब झालेले पंचलिंग बदलून काळ्या पाषाणात नवीन पंचलिंग घडवून या तीन मूर्तीची पाऊतके मंदिरात मागील महिण्यात धार्मिक होमहवन करुन गावातील अकरा जोडप्याच्या हस्ते पुर्नप्रतिष्ठापना करण्यात आलेली असल्याचे देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे,वाघे,वीर मंडळीनी सांगितले.

यावेळी शरद बँकेचे मा.अध्यक्ष आण्णासाहेब पाटील जाधव,पहाडदर्‍याचे सरपंच मच्छिंद्रशेठ वाघ,धामणीचे पोलीस पाटील सुरज सुधाकर जाधव,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,अविनाश बढेकर,अशोक केरुजी जाधव,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,माऊली जाधव वाघे,सिताराम जाधव,बबन नाना जाधव,श्रीधर नाना जाधव,जिंतेंद्र देवराम जाधव,गौतम मारुती जाधव,रमेश छबन जाधव,सुभाष फकीरा जाधव,भगवान लक्ष्मण जाधव,दिपक विठ्ठल जाधव,अंकुश कैलास जाधव,भरत शिवाजी जाधव,राहूल धोंडीभाऊ जाधव,चंद्रमणी चिंतामण जाधव,सुधाकर लक्ष्मण जाधव,कृष्णा जयवंत जाधव,चुडामणी श्रीपती जाधव,करण नामदेव जाधव,अक्षय रामदास जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.जिर्णोध्दार समितीच्या वतीने सर्व देणगीदाराचा सत्कार करण्यात आला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.