ताज्या घडामोडीराजकीय

मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेना सोशल मीडिया टीम लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज !!

मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेना सोशल मीडिया टीम लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज !!

आज लांडेवाडी, तालुका-आंबेगाव येथील प्रेक्षागृहामध्ये शिवसेना सोशल मीडिया व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी खास मुंबईवरून शिवसेना सोशल मीडिया टीमचे समन्वयक सुमित शेलार व शो टाईम कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून विविध प्रकारची महत्त्वाची माहिती उपस्थितांना मिळाली.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोशल मिडीया हा महत्वाचा घटक असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार समर्थपणे काम करत असून शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसैनिकांनी शिवसेनेमार्फत राबविण्यात आलेले सामाजिक उपक्रम व विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करावा असे शिबीराला मार्गदर्शन करताना मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे, शिवसेना पुणे जिल्हा संघटक अशोक भुजबळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, प्रकाश वाडेकर,शिवउद्योग सहकारसेना आंबेगाव तालुका अध्यक्ष सागर काजळे,अनिल काशिद, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके, रामभाऊ सासवडे, विपुल शितोळे, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, प्रविण थोरात पाटील, धनंजय पठारे, गणेश सातव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले व उपस्थितांचे आभार युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर यांनी मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.