आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे घवघवीत यश!!
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे घवघवीत यश!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,लोणेरे अंतर्गत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे येथे नुकतीच आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पार पडली.
पुणे विभागामधून १२ महाविद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला.या स्पर्धेत विविध स्पर्धा प्रकारांचे आयोजन करण्यात आलेले होते.या स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे या औषध निर्माण शास्त्र पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली व सर्व स्पर्धांमध्ये क्रमांक पटकविले. ऍथलेटिक्स मध्ये २०० मी धावणे या क्रीडाप्रकारात सिद्धेश शेळके याने द्वितीय क्रमांक,बॅटन रीले ४×१०० मी यामधे टीम समर्थ-गौरव काळे,मंगेश थोरात,सिद्धेश शेळके,तन्मय खोकराळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
ट्रिपल जंप मध्ये तन्मय खोकराळे याने द्वितीय क्रमांक व सिद्धेश शेळके याने चतुर्थ क्रमांक मिळवला.
वैयक्तिक स्पर्धेत गोळाफेक(मुले)-प्रसाद भोर या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर मुलींमध्ये आवंती काळे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
थाळीफेक स्पर्धेत यशोधन पोंदे याने द्वितीय क्रमांक तर प्रतीक कोळी तृतीय क्रमांक पटकावला.
थाळीफेक स्पर्धा-मुलींमध्ये द्वितीय क्रमांक आवंती काळे,तृतीय क्रमांक साक्षी हिंगे हिने पटकावला.
या विद्यार्थ्यांना क्रिडा संचालक एच पी नरसुडे,क्रीडा समन्वयक प्रा.सचिन भालेकर,क्रीडा शिक्षक डॉ. राजाभाऊ ढोबळे,डॉ.ज्ञानेश्वर जाधव,प्रा.प्रसाद तांबे यांनी मार्गदर्शन केले.
विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.