श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी (चिंचोडी) ला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार!!
भैरवनाथ पतसंस्थेला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार!!
शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील संस्थापक,अध्यक्ष असणाऱ्या भैरवनाथ पतसंस्थेला पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 देऊन गौरविण्यात आले.
ओझर येथे झालेल्या कार्यक्रमात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे व संचालक मंडळ, संस्थेचे पदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.या प्रसंगी सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य अनिल कवडे, अप्पर आयुक्त निबंधक महाराष्ट्र राज्य पतसंस्था श्रीकृष्ण वाडेकर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था योगीराज सुर्वे,जिल्हा उपनिबंधक पुणे ग्रामीण प्रकाश जगताप, सहाय्यक निबंधक जुन्नर सचिन सरसमकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे होते.
यावेळी संस्थेचे संचालक हनुमंत तागड,योगेश बाणखेले,अशोक गव्हाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, विभागीय अधिकारी संतोष पाचपुते, शाखाव्यवस्थापक राहुल बांगर आदी उपस्थित होते.
संस्थेकडे एकूण 410 कोटी रुपयांच्या ठेवी असून संस्थेने 302 कोटींचे कर्जवाटप केलेली आहे. केवळ नफा कमवणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी अत्यल्प व्याजदराने वित्त पुरवठा केलेला आहे. संस्थेच्या 17 शाखा कार्यरत असून संस्थेचे सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत.
मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने चालू आर्थिक वर्षात 500 कोटींच्या ठेवी व चारशे कोटींचे कर्ज वाटपाचे ध्येय ठेवले असल्याची माहिती संस्थेचे संचालक हनुमंत तागड,योगेश बाणखेले ,अशोक गव्हाणे यांनी दिली.