आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (पारगाव) येथे चिमुकल्यांची किल्ले बनवण्यासाठी लगबग!!
आर्यन गोरडे, शिवम गोरडे,मयूर गोरडे,शुभम गोरडे यांना बनवलेला किल्ला
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (पारगाव) येथे चिमुकल्यांची किल्ले बनवण्यासाठी लगबग!!
प्रतिनिधि-शिंगवे पारगाव
मुलांना नुकतीच दीपावलीची शालेय सुट्टी लागली असून प्राथमिक शाळेतील लहान मुलांसह, माध्यमिक वर्गातील मुलांची किल्ले बनवण्याची लगबग दिसून येत आहे.
दिवाळी सन म्हटलं की किल्ले बनवणे हा लहान मुलांचा आवडता विषय दोन दिवसापूर्वीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी लागली असुन लहान मुलांची किल्ले बनवण्याची लगबग दिसून येत आहे. शाळेतील शिक्षकांनी दिवाळीतील उपक्रम म्हणून लहान मुलांना घरी किल्ले बनवण्यास सांगितले असल्याने मुले किल्ले बनवन्यासाठी साहित्य जमा करताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात अनेक लहान मुले एकत्र येऊन किल्ले बनवत आहेत त्यासाठी माती, विटा, रंग, सैनिक, एकत्र गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसारखे प्रति छोटे छोटे किल्ले बनवून त्याला शिवनेरी, रायगड, राजगड, लोहगड, तोरणागड अशी नावे दिली जात आहेत. तसेच अनेक गावांमध्ये ऐतिहासिक संस्कृती जपावी म्हणून विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून किल्ले बनवा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.