आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी(ता.आंबेगाव)येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय काकड आरती सोहळा!!

जारकरवाडी(ता. आंबेगाव)येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय काकड आरती सोहळा!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात भक्तिमय वातावरणात काकड आरती चा सोहळा संपन्न होत आहे.

वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो.जारकरवाडी( ता. आंबेगाव) येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भक्तीमय वातावरणात हा काकड आरती सोहळा संपन्न होत आहे.पुर्वी सर्व गावकरी,परिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. पण जग बदलले.आधुनिक युगात प्रगती झाली. अलिकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली.आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरूष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात. गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ, मृदूंग, चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात. आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून, स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी. आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरतीमागील उद्देश असू शकतो.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.