आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नांदी फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!!

नांदी फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी-समीर गोरडे
पारगाव,शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून नन्हीकली उपक्रमांतर्गत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शालेय दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

देशभरात नांदी फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील ३१ ठिकाणी नन्हीकली उपक्रम राबविला जातो. ३१ ठिकाणी एक लाख ९८ हजार नन्ही कलींना यातुनशालेय साहित्याचे वाटप केले जाते.महाराष्ट्रात पाच ठिकाणी हा उपक्रम राबविला जात असून. त्यातील आंबेगाव तालुका हे एक आहे.आंबेगाव तालुक्यामध्ये एकूण १०३ जि.प.शाळा व माध्यमिक विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जात असुन तालुक्यातील ६८०० विद्यार्थीनी यात सहभागी आहेत. पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे व वैयक्तिक शालेय साहित्याचे व वैयक्तिक साहित्याचे वाटप केले जाते. अशी माहिती प्रोग्राम ऑफिसर मनिषा सपकाळे यांनी दिली.

शिंगवे येथे शालेय साहित्याचे वाटप टेकनिकल ऑफिसर वैशाली सांडभोर, धनश्री चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या विद्यार्थ्यांनींना शालेय बॅग, रेनकोट वह्या, पेन्सिल, रंगाचे साहित्य, यासारखे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, नन्नी कली उपक्रमाच्या चित्रा पंडीत, स्वाती गोरडे, वर्षा लोंढे, आरती लोखंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.