आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव)परिसरात जीवो नेटवर्क सेवा विस्कळीत!!चोवीस तासांहून अधिक काळ नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त!!

धामणी(ता.आंबेगाव)परिसरात जीवो नेटवर्क सेवा विस्कळीत!!

चोवीस तासांहून अधिक काळ नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त!!

धामणी आणि परिसरात शुक्रवारी दुपार पासून ते शनिवार दुपार पर्यंत जिवो नेटवर्कची सेवा विस्कळीत असून यामुळे नागरिक त्रस्त असून पहिल्यांदाच एवढा जास्तवेळ नेटवर्क गायब आहे. या परिसरात जास्त जिवो सिम कार्ड धारक ग्राहक असल्याने एकमेकांपासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित कंपनीने याची दखल घेऊन सेवा सुरळीत करावी अशी मागणी धामणी गावच्या सरपंच सौ.रेश्मा बोऱ्हाडे यांनी केली आहे.

याचा फटका शेजारील पहाडदरा, शिरदाळे परिसरात देखील बसला असून जिवो ला थोड्या फार प्रमाणात नेटवर्क या भागात असते परंतु ते देखील गायब झाल्याने नागरिक अधिकचे त्रस्त असून आधीच नेटवर्कची बोंबाबोंब आणि त्यात हा खोळंबा यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे. तसेच पहाडदरा शिरदाळे परिसरात कायमस्वरूपी नेटवर्क मिळावे यासाठी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असून लवकरात लवकर शाश्वत नेटवर्कची सोय करावी अशी मागणी शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे,पहाडदरा येथील युवक संकेत वायकर यांनी केली आहे.

गेल्या चोवीस तासांहून अधिक काळ नेटवर्क नसल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्क साधने अडचणीचे होत आहे.जिवो धारक ग्राहक जास्त असल्याने अजूनच अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने लवकरात लवकर सेवा सुरळीत करावी. तसेच भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी आग्रही मागणी धामणी गावच्या सरपंच सौ.रेश्मा अजित बोऱ्हाडे यांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.