आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ शैक्षणिक संकुलात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न!!

समर्थ गुरुकुल व जुनिअर कॉलेज चे घवघवीत यश!!तालुक्यातून एकूण ८७ संघाचा सहभाग!!

समर्थ शैक्षणिक संकुलात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न!!
समर्थ गुरुकुल व जुनिअर कॉलेज चे घवघवीत यश!!

तालुक्यातून एकूण ८७ संघाचा सहभाग!!

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तालुका क्रीडा व शिक्षक संघटना आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कुल बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल येथील क्रीडा संकुलात पार पडली.जुन्नर तालुक्यातून या स्पर्धेसाठीएकूण ८७ संघ सहभागी झाले होते अशी माहिती प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.

संस्थेचे सचिव विवेक शेळके व जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी प्रथमतः सर्व खेळाडूंना स्पर्धेचे नियम व अटी समजावून सांगितल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गणेश राऊत म्हणाले कि,शरीर संपदा हीच खरी संपत्ती आहे.विद्यार्थ्यांनी व्यायाम,कसरत आणि मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे.स्पर्धा ही आनंद मिळवून देणारे एक माध्यम आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
१४ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-जि.प.प्रा.शाळा,गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल,बेल्हे
तृतीय क्र.-विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल,साकोरी

१४ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.- जि.प.प्राथ.शाळा,गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल,बेल्हे
तृतीय क्र.-श्रीमती रे.बा.देवकर विद्यालय,वडगाव आनंद

१७ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-माध्यमिक विद्यालय,गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-महात्मा फुले विद्यालय,खोडद
तृतीय क्र.-मॉडर्न इंग्लिश स्कुल,बेल्हे

१७ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.-माध्यमिक विद्यालय,गुंजाळवाडी
द्वितीय क्र.-महात्मा फुले विद्यालय,खोडद
तृतीय क्र.-सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय,पिंपरी पेंढार

१९ वर्षे वयोगट(मुली):
प्रथम क्र.-रा.प.सबनीस ज्युनिअर कॉलेज,नारायणगाव
द्वितीय क्र.-समर्थ ज्युनियर कॉलेज,बेल्हे
तृतीय क्र.-सावित्रीबाई फुले विद्यालय,ओतूर

१९ वर्षे वयोगट(मुले):
प्रथम क्र.-गुरुवर्य रा.प.सबनीस ज्युनिअर कॉलेज,नारायणगाव
द्वितीय क्र.-समर्थ जुनियर कॉलेज,बेल्हे
तृतीय क्र.-समर्थ गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल,बेल्हे

बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,क्रीडा संचालक एच पी नरसुडे सर,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,एम बी ए चे प्राचार्य डॉ. शिरीष गवळी,ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली आहेर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.किरण वाघ,डॉ.ज्ञानेश्वर जाधव,प्रा.संतोष पोटे,प्रा.राजेंद्र नवले,प्रा.विनोद चौधरी,प्रा.अक्षय सूनसुळे,प्रा.गणेश नवले,प्रा.रविंद्र नवले,प्रा.प्रसाद तांबे,प्रा.गणेश लामखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.