काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव)येथील कै.गेनभाऊ सावळेराम करंडे (वय 105) यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने करंडे कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काठापुर बुद्रुक येथील स्मशानभूमीत केले 105 वृक्षांचे रोपण!!
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव)येथील कै.गेनभाऊ सावळेराम करंडे (वय 105) यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने करंडे कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ काठापुर बुद्रुक येथील स्मशानभूमीत 105 वृक्षांचे रोपण केले.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील कै.गेनभाऊ सावळेराम करंडे वय वर्षे 105 यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्त करंडे कुटुंबीयांच्या वतीने काठापूर बुद्रुक येथील स्मशान भूमीत 105 वृक्षांचे रोपन करण्यात आले. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम,माजी जि.प.सदस्य देविदास दरेकर,ह.भ.प. शांताराम महाराज जाधव,ह.भ.प. जालिंदर महाराज करंडे,ह.भ.प.गणेश महाराज शिंधे, ह.भ.प. बारीकराव महाराज गायकर, शरद बँकेचे संचालक दौलत भाई लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले ,जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब खिलारी,प्रमोद वळसे,सरपंच अशोक करंडे ,पेठ चे सरपंच राम तोडकर,मा. उपसरपंच विशाल करंडे,ह.भ.प.अमित कातळे, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या पर्यावरणाचा झालेला रास आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळलेला असताना वृक्षारोपण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. याच भावनेतून करंडे कुटुंबीयांनी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले आहे हा उपक्रम अतिषय चांगला आहे असे यावेळी देवदत्त निकम म्हणाले.
काठापूर बुद्रुक येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात करंडे हे मोठे कुटुंब आहे. माझी सरपंच रघुनाथ करंडे ,उल्हास करंडे, सोपान करंडे ,सचिन करंडे, कान्हु करंडे,दगडु करंडे,कुंडलीक करंडे, बाळासाहेब जाधव, पंडित पवार, लक्ष्मण टाव्हरे,शांताराम करंडे,प्रविण करंडे,समिर करंडे,संदेश करंडे,बाबाजी करंडे,धनंजय करंडे,रविंद्र करंडे,यांसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.