आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात!!शिरदाळे येथे बटाटा लागवड रखडली!!

 

पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात!!शिरदाळे येथे बटाटा लागवड रखडली!!

जुलै महिना अर्ध्यावर आला तरी पाऊस नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाचा खरीप हंगाम धोक्यात आला असून काही भागात झालेली पेरणी देखील आता वाया जात आहे. सुरवातीला थोडा रिमझिम पाऊस झाला त्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती परंतु परत पाऊस होईल या आशेने केलेली पेरणी मातीत गेली आहे. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस नाही. सुरवातीला होणारा वळीव पाऊस यंदा झाला नाही त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर रूप घेत आहे. मका, भुईमूग पाला अशा खाद्यासाठी शेतकरी वणवण फिरत आहे. त्यात उसाचे वाढे काही प्रमाणात उपलब्ध होईल तसे आणले जात आहे. परंतु वाढे देखील जास्त प्रमाणात उपलब्द।होत नसून ते शेतकऱ्यांना पुरवताना कसरत होत असल्याचे वाढे विक्रेते आणि शेतकरी रंगनाथ जाधव यांनी सांगितले.
तर शिरदाळे येथे होणारी बटाटा लागवड यंदा मोठ्या प्रमाणावर घटली तर आहेच शिवाय ज्यांनी बियाणे आणले आहे ते देखील पावसाच्या प्रतीक्षेत घरात पडून आहे. काही शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे परंतु पाऊस झाला नाही तर दे देखील खराब होईल असे लागवड केलेले शेतकरी बाबाजी चौधरी,निवृत्ती मिंडे,कांताराम तांबे,कचर तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले. हीच परिस्थिती लोणी,धामणी,पहाडदरा परिसरात असून लवकर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर खूप वाईट वेळ येईल असे शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील,वडगावपीर मा.सरपंच संजय पोखरकर,महेंद्र वाळुंज,शिरदाळे उपसरपंच मयुर सरडे,धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव ,मा.सरपंच मनोज तांबे यांनी सांगितले.

“चालू वर्षी पाऊस खूप लांबला आहे. त्यामुळे पेरणी झालेले पीक वाया जाण्याची भीती आहेच शिवाय पाणी टंचाई,चारा टंचाई ही समस्या मोठ्या प्रमाणावर उभी राहू शकते त्यामुळे शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी काही तरी सुविधा करावी जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. पुढील आठ दिवसात पाऊस झाला नाही तर सर्वत्र टँकर पुरवावे लागतील अशी माहिती शिरदाळे गावचे उपसरपंच श्री.मयुर सरडे यांनी पंचनामाशी बोलतांना दिली.”

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.