आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे) पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल धामणी ग्रामस्थांकडून सत्कार!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे) पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल धामणी ग्रामस्थांकडून सत्कार!!
आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील धामणी येथे १६ फेब्रुारीच्या रात्री गोविंद भगवंत जाधव व त्यांची पत्नी नंदाबई यांचे हातपाय बांधून त्यांच्या घरावर दरोडा टाकून दागिने व रोख रककम असे एक लाख साठ हजार रुपये चा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता .या चोरीचा छडा पारगाव पोलिसांनी दोन दिवसांत लावला .मात्र आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाचा आदेशाने सोमवार (दि.२६) रोजी पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते जेष्ठ दाम्पत्यांना सुपूर्त करण्यात आला. पारगाव पोलिस स्टेशन च्या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मिन झाले असुन पोलिस प्रशासनाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे . या निमत्ताने पारगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, उप निरीक्षक भाऊसाहेब लोकरे व सर्व स्टाफ चा धामणी ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला .या प्रसंगी उपसरपंच संतोष करंजखेले , ग्रा. प.सदस्य अक्षय विधाटे, अमर रोडे उपस्थीत होते.