आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

खडकवाडी(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरविला भक्तीचा मळा!! पायी दिंडी सोहळा केला संपन्न!!

खडकवाडी(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरविला भक्तीचा मळा!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर या ठिकाणी अनेक लाखो वारकरी नतमस्तक होण्यासाठी पांडुरंग पांडुरंग करत पाई वारी जात असतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. आज असाच एक छानसा उपक्रम माध्यमिक विद्यालय आणि,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी या ठिकाणी आषाढी वारी एकादशीच्या निमित्ताने शाळेतील मुलांनी पायी दिंडी सोहळा माध्यमीक विद्यालय शाळेपासून ते भैरवनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत आयोजन करण्यात आले.

सकाळी शाळेतून बाल दिंडीचे प्रस्थान झाले. विठू नामाचा जयघोष करत सर्व बाल वारकरी गावातुन मार्गस्थ झाले. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • भैरवनाथ मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी विसाव्याला चौकात थांबली. मुलांनी गोल रिंगण करून तालात नाचत गात विठू नामाचा जयघोष चालू ठेवला. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग गायले.गावातील सर्व महिला भगिनी, ग्रामस्थ, पालक आवर्जून मुलांचा बाल दिंडीचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते. महिलांनी व भाविकांनी अतिशय मनोभावे पालखीची व विणेकरी व तुळशीधारी बाल वारकऱ्यांची पूजा केली.गोल रिंगणामध्ये बाल वारकऱ्यांनी छोटे छोटे अतिशय उत्तम खेळ सादर केले. पायी दिंडी वारीला विठ्ठल रुक्मिणीची सजावट टाळ मृदंगाची साथ व विद्यार्थ्यांच्या अंगावरती वारकऱ्यांचा पोशाख या सर्व आनंदातून विद्यार्थ्यांच्या उत्साह आणखी द्विगुणीत झाला. मुलांनी उत्तम ठेक्यात ‘ज्ञानोबा तुकाराम चा गजर सुरू केला. त्यानंतर सर्व मुलांनी व ग्रामस्थांनी फुगडीचा आनंद घेतला.
    या सोहळ्या साठी सर्व शाळेतील शिक्षक,मुख्याद्यापक पदाधीकारी, भजणी मंडळ पालक,ग्रामस्थ उपस्थीत होते.
Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.