आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात अवतरली पंढरी!

आंबेगाव तालुक्यातील धामणी गावात अवतरली पंढरी!!

अवघा महाराष्ट्र आषाढी वारी च्या निमित्ताने भक्तीमय झालेला आहे. आज धामणी येथे आषाढी वारीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या वतिने धामणी गावामध्ये वारी काढण्यात आली. गावच्या पेठेमधुन प्रभात फेरी काढण्यात आली. त्यादरम्यान पंचाच्या पारावर विद्यार्थ्यानी भजन सादर केले. संत सावता महाराज मंदिरामध्ये विद्यार्थिनी फुगडी खेळून अभंग म्हणत गोल रिंगण करून भक्तिमय वातावरणात वारिचा आनंद घेतला विशेष म्हणजे विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभुषा केलेल्या विद्यार्थिनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले .

त्या प्रसंगि उपस्थित प.स.सदस्य रविंद्र करंजखेले , सरपंच रेश्मा बोऱ्हाडे , मा. सरपंच सागर जाधव, उपसरपंच संतोष करंजखेले ,ग्रा. प . सदस्य अक्षय विधाटे, शा. व्या. क. अध्यक्ष भाऊ कदम , तंटामुक्ती अध्यक्ष नितिन जाधव , अमर रोडे , सतिश देशमुख ,मुख्यध्यापिक कथले मॅडम , हिंगे , कोठावळे , पडवळ मॅडम बहुसंख्यने ग्रामस्थ उपस्थित होते .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.