ग्रामदैवतांच्या यात्रा सोडून वाढदिवस,राजकीय कार्यक्रम,इतर कोणतेही कारणाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यावर बंदी!!

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना कायमस्वरूपी परवानगी दिली आहे .परंतु महाराष्ट्र सरकारने तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करूनच या बैलगाडा शर्यती चे आयोजन यात्रा उत्सव समिती यांना करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गावातील ग्रामदैवतांच्या यात्रा सोडून इतर,म्हणजे वाढदिवस राजकीय कार्यक्रम व इतर कोणतेही कारणाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये. आणि अशा स्वरूपाच्या बैलगाड्या शरीरातील परवानगी देऊ नये असे आदेश पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. मागील दीड वर्षापासून बैलगाडा शर्यतींना तात्पुरत्या स्वरूपात बंदी उठवल्यानंतर सुरुवात झाली होती. तर काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींचा अंतिम निकाल दिला असून बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली आहे. ही परवानगी देताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियम अटीमध्येच तसेच महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्येच बैलगाडा शर्यतीचे आयोजन आयोजकांनी करावे असे स्पष्ट सांगितले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना त्या गावातील यात्रा जत्रा उरूस असेल त्याच वेळेस बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यासाठी कळविले आहे. त्याचप्रमाणे वाढदिवस राजकीय कार्यक्रम किंवा इतर कार्यक्रमांसाठी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाला परवानगी देऊ नये असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे राजकीय लोकांच्या वाढदिवसाच्या यात्रांचे आयोजन आता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यती आयोजित करत असताना 1000 मीटर पेक्षा जास्त लांबीची धावपट्टी नसावी त्याचप्रमाणे बैल आणि घोडा यांना एकत्र पळविण्यात येणार नाही या स्वरूपाचे नियम पाळावे लागनार आहे.
त्याचप्रमाणे बैलगाडा मालकांनाही बैलांची आरोग्य सर्टिफिकेट देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पदवीधर पशुवैद्यकीय अधिकाराचे हे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आयोजकांनी योग्य पद्धतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले नाही त्या आयोजकांवर गुन्हे दाखल होणार असून दंडाच्या स्वरूपात शिक्षा किंवा तीन वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आयोजकांनी यात्रा पार पडल्यानंतर तिस दिवसाच्या आत यात्रेचे चित्रीकरण केलेले शूटिंग तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता जिल्हाधिकारी यांचेकडे करण्याचे ही सांगण्यात आलेले आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना आयोजकांवर ही जबाबदारी आता वाढलेले आहे. सध्या ग्रामीण ग्रामदैवताचे यात्रा संपत आल्या असून बरेच ठिकाणी वाढदिवसाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे परंतु शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाहता वाढदिवसाच्या यात्रेंना मात्र खो बसणार आहे.
त्याचप्रमाणे बैलांना मारहान काढी किंवा चाबकाने मारणे किंवा इतर स्वरूपात त्रासदेणार्या बैलगाडा मालकांवरही खुण्हा दाखल होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच शर्यतीचे आयोज करताना नियमाचे पालन करूनच शर्यतीचे आयोजन करावे. जेणेकरून त्या गावातील यात्रा बंद होनार नाही. त्यामुळे यात्रा कमिट्यांवर तसेच बैलगाडा मालकांची जबाबदारी ही वाढली आहे.