माळशिरस मध्ये रंगणार नगराध्यक्ष चषक स्पर्धेत बुद्धिबळाच्या लढती!!
माळशिरस मध्ये रंगणार नगराध्यक्ष चषक स्पर्धेत बुद्धिबळाच्या लढती!!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा.डॉ.श्री.आप्पासाहेब देशमुख यांच्या नावे श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस यांचे वतीने भव्य राज्यस्तरीय नगराध्यक्ष बुद्धिबळ चषकचे आयोजन दिनांक 28 मे रोजी करण्यात आले आहे.
सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि माळशिरस तालुका चेस असोसिएशन यांचे सहकार्याने सदर स्पर्धा 10 वर्ष, 15 वर्षे आणि खुल्या वयोगटात घेतल्या जाणार असून रुपये 12000 ची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.स्पर्धेच्या तीनही गटांमध्ये मिळून 20 रोख बक्षिसे, 25 ट्रॉफी आणि 30 मेडल्स दिली जाणार आहेत.खेळाडूंसोबतच पालकांनाही खुल्या गटातून खेळण्याची संधी मिळणार असून मुख्य बक्षिसांसोबतच सर्वात लहान खेळाडू, सर्वात ज्येष्ठ खेळाडू, उत्कृष्ट महिला पालक, उत्कृष्ट पुरुष पालक व उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू यांनाही खास सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन समारंभ दिनांक 28 रोजी सकाळी 10.00 वाजता श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या ठिकाणी होणार असून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य श्री.गुजरे सर यांनी केले आहे.स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी 9545798598 व 9028919005 या क्रमांकावर संपर्क साधावा.