आरोग्य व शिक्षण

Chief Minister Relief Fund: आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज; सरकारचा ‘गतिमान’ निर्णय!!

Chief Minister Relief Fund: आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज; सरकारचा ‘गतिमान’ निर्णय!!

विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते.’मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. तातडीने मदत करणे हा उद्देश या योजनेचा आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कुठे संपर्क साधायचा? याची माहिती अनेकांना नसते. पण आता एका मिस्ड कॉलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत अनेकदा रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता एका मिसकॉलवर हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, आता वरील क्रमांकावर मिस्ड कॉलवर देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत तब्बल 60 कोटींवर मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात.

यासाठी आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. अशा जनतेसाठी ही मिसकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.

कशी असणार प्रक्रिया?
मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमकांवर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाईलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिल्यांदाच भाजलेल्या, शॉक लागलेल्या रुग्णांना देखील प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.