आरोग्य व शिक्षण
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरच्या बेट वस्तीवर पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा!! अंगठी केली गायब!!

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर- पारगाव रस्त्यावर असणाऱ्या निरगुडसरच्या बेट वस्ती येथील श्री. खंडू भाऊ टाव्हरे (वय -८२ वर्ष) या ज्येष्ठ व्यक्तीची दोन अज्ञात चोरट्यांनी फसवणूक केल्याची घटना दि. 19 मे 2023 रोजी घडली आहे.
टाव्हरे हे दिनांक 19 मे रोजी निरगुडसर-पारगाव रस्त्यावरील बेट वस्ती येथे पत्रा कंपनीच्या समोर उभे असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येऊन तुमच्या परिसरातील लोकांचे दागिने चोरीला गेले आहेत.मी पोलीस असून मी साध्या वेशात फिरत आहे.तुमच्या हातातील अंगठी, मोबाईल, घड्याळ,जवळचे पैसे काढून रुमालात मध्ये ठेवा असे म्हणत टाव्हरे यांच्याकडून रुमालात अंगठी ठेवून हातचलाखी करत अंगठी पळून नेली.याबाबत टाव्हरे यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो.स. घोडके करत आहेत.