आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नवी मुंबईच्या पुरुश्रुत संजय खिलारी यांनी सातत्याने जिंकली तिसरी सायकलिंग स्पर्धा!!

नवी मुंबईच्या पुरुश्रुत संजय खिलारी यांनी सातत्याने जिंकली तिसरी सायकलिंग स्पर्धा!!

या स्पर्धेपूर्वी पुरुश्रुत खिलारी यांनी लेह लडाख आणि गोवा उटी कूर्ग, गोवा ( अंतर १७८० कि.मी. ) येथील स्पर्धा प्रथम व द्वितीय क्रमांकाने जिंकून आता १५ ऑगस्ट २०२३ रोजी नुकतीच @irregulars.ultra या संगठन द्वारे आयोजित केलेल्या zwift वर १४ तारखेला रात्री १२ वाजता सुरू झालेली 6-12-24 National Virtual Time Trial Championship 2023 प्रथम क्रमांकाने जिंकली. ही आगळी वेगळी स्पर्धा इनडोअर असून प्रत्येक स्पर्धकांनी आपापल्या घरी राहूनच एकाच जागी उभी असलेली सायकल चालवून 24 तासांमध्ये 680 किलोमीटर इतके अंतर फिनिश करायचे होते. कॉम्प्युटर कॅमेरा वरूनच स्पर्धा मॉनिटर केली जाते . मूळ नारायणगावचे पुरुश्रुत खिलारी हे नवीमुंबई येथे रहात असून त्यांनी २४ तासात 721 किलोमीटर अंतर कापून पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान निश्चित केले. एखाद्या कारने पण 24 तासांमध्ये एवढं ड्रायव्हिंग करणे ही सोपे जाणार नाही. 24 तासाच्या कालावधीमध्ये त्यांनी मधून मधून काही मिनिटे ब्रेक घेतला. ही स्पर्धा आउटडोर सायकलिंग पेक्षाही खूप कठीण असते. कारण या स्पर्धेत जराही कुठे लवचिकपणा नसतो. यात सायकलिस्ट ला प्रचंड ताण सहन करावा लागतो. ही स्पर्धाच मुळात आहे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या शक्तीचा कस पाहणारी. सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना आपली निर्धारित अंतर सुद्धा पूर्ण करता आले नाही इतकी ही आव्हानात्मक स्पर्धा असते . या 24 तासाच्या स्पर्धैमध्ये पुरुश्रुतचे आई -वडील संजय खिलारी आणि नूतन खिलारी यांना सुद्धा त्याला काय हवं नको ते पाहण्यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागले. या शारीरिक व मानसिक शक्तीच्या चाचणी स्पर्धेचा उपयोग पुरूश्रुतला २०२५ साली विचाराधीन असलेल्या अमेरिकेतील १२ दिवसांत ४८०० की.मी.अंतराच्या अतिशय कठीण असलेल्या अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी या अनुभवाचा उपयोग होईल असे त्याचे म्हणणे आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.