खडकवाडीकर सलाम तुमच्या कार्याला!!खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे सेवानिवृत्त सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचा सन्मान सोहळा झाला संपन्न!!

खडकवाडीकर सलाम तुमच्या कार्याला!!
खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे सेवानिवृत्त सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचा सन्मान सोहळा झाला संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी येथे सेवानिवृत्त सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचा सन्मान सोहळा पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लहु थाटे,पोलीस श्री.साळवे यांच्या हस्ते संपन्न झाला.
खडकवाडी गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. या उपक्रमात नवनाथ डोके, दत्तात्रय वाळुंज, नामदेव वाळुंज, संभाजी सिनलकर, गणेश सुक्रे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच नितीन सुक्रे, सोपान डोके, बाळशिराम धुमाळ,गुलाब डोके, नानासाहेब पोखरकर या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मा.सरपंच अनिल डोके, सरपंच कमल सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे, पोलीस पाटील संपत डोके, सोसायटीचे मा. चेअरमन श्री.नाथा सुक्रे, सोसायटीचे चेअरमन संतोष सुक्रे, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ वाळुंज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप नेते किरण वाळुंज यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार मा. सरपंच अनिल डोके यांनी मानले.