आरोग्य व शिक्षण

अवसरी बुद्रुक ते पहाडदरा या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात…!!

अवसरी बुद्रुक ते पहाडदरा या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात…!!

आंबेगाव तालुक्याचा पूर्वपट्ट्यातील पहाडदरा, धामणी, लोणी या गावांना जोडणारा अवसरी बुद्रुक पहाडदरा हा अत्यंत सोयीचा रस्ता आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युती सरकारचे माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू झाले होते. परंतु वनविभागाच्या परवानगीमुळे या कामाला विलंब झाला होता. गेल्या दोन वर्षांत ह्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे नागरीक ह्या रस्त्याचा वापर टाळत होते. हा रस्ता व्हावा यासाठी अवसरी बुद्रुक, पहाडदरा व धामणी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून या रस्त्याची साफसफाई व दुरुस्तीचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. संपूर्ण यंत्रणा वापरून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पुन्हा एकदा नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी सज्ज होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या कामासाठी चालना देणाऱ्या महायुती सरकारचे अवसरी बुद्रुक,पहाडदरा, धामणी, लोणी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.या रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्यामुळे अवसरी बुद्रुक, पहाडदरा धामणी, लोणी व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.हा रस्ता सुस्थितीत झाल्यास पहाडदरा परिसरातील पावसाळ्यात होणाऱ्या पर्यटनाला निश्चित चालना मिळण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात पहाडदरा घाट, महादेव परिसर,डोंगरदर्या व निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी संपुर्ण आंबेगाव तालुका व परिसरातून अनेक नागरिक गर्दी करत असतात आणि त्यासाठी हा रस्ता अत्यंत गरजेचा होता असे शिवसेना नेते अजित चव्हाण यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.