आरोग्य व शिक्षण

इको रेस्कुय टीम दौंडने करमाळा तालुक्यातील पांगेरे गावात वाचवला ६० पक्षांचा जीव!!

चार दिवसांपूर्वी इको रेस्क्यू दौंड या आमच्या संस्थेच्या हेल्पलाइन नंबर वर फोन आला की करमाळा तालुक्यातील पांगरे गावामध्ये एका जुन्या वडाच्या झाडाच्या फांद्या वादळी पावसामध्ये पडल्या आहेत आणि त्यावरील ५०-६० पक्षी खाली पडले आहेत. त्यामुळे मदतीसाठी तुम्ही लवकर या.
आमच्या समोर एकच प्रश्न होता एवढ्या मोठ्या संख्येने पडलेल्या या पक्षांची व्यवस्था कशी करावी. हे पक्षी ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन मिळतील त्या पद्धतीने पुठ्ठा बॉक्स घेतले आणि विलंब न करता त्या ठिकाणी रेस्क्यू ॲम्बुलन्स घेऊन पोहोचलो. तेथील दयनीय परिस्थिती पाहताना अक्षरशः अंगावर काटा आला. दोनशे वर्ष जुनं वडाचे झाड होतं. आता फक्त त्या झाडावर एकच छोटी फांदी शिल्लक होती. आणि त्यावर एक चित्रबलाक पक्षाचा घरट. बाकी झाडाच्या सर्व फांद्या वादळामध्ये कोसळल्या होत्या. वादळ हे जरी एक कारण त्याला असलं तरी दुसरं कारण म्हणजे जवळपासच्या माणसाने झाडाच्या खोडाजवळ कचरा जाळून झाडाचे खोड पोकळ बनल होतं.
चित्रबलाकची साधारणपणे ३० ते ३५ घरटी त्या वडाच्या झाडावर होती. या झाडाच्या फांद्या पडल्यानंतर बरेचसे पक्षी त्या फांद्यान खाली दबले गेले होते. आमच्या टीम मेंबरने चित्रबलाक आणि रात्रीचर बगळ्यांची पिल्लं गोळा करण्यास सुरुवात केली तर एकूण ६७ वेगवेगळ्या वयाची पिल्ल फांद्याखाली जिवंत स्वरूपात भेटली. आणि शंभर पेक्षा जास्त चित्रबलाक ची पिल्ले मृत्यूमुखी मुखी पडली होती. त्यामधील बऱ्याच पिल्लांचे पंख, पाय अधू झाले होते. अंगावर जखमा झाल्या होत्या. त्या पक्षांना प्राथमिक उपचार करून त्यांना अलगद बॉक्समध्ये ठेवून त्यानंतर उपचारासाठी आणि पुढील सुश्रुशेसाठी त्यांना रेस्कू चॅरिटेबल ट्रस्ट, बावधन येथे घेऊन जाण्यात आलं. तेथे नक्कीच त्यांच्यावर चांगली सुश्रुषा होऊन त्यातील बरेचश्या पक्षांना जीवदान मिळल.
हे सर्व प्रकार पाहून मन हळहळत. यामध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे जरी फांद्या कोसळल्या असल्या तरी मनुष्य हस्तक्षेपही याला जबाबदार आहे हे नक्कीच खरं. त्या दोनशे वर्ष जुन्या वडाच्या खोडापाशी कचरा जाळण्याच ठिकाण बनवलं नसतं तर हा धोका कदाचित टळू शकला असता. त्यावरील अनेक जीव जगले असते. याचा विचार जर कोणी केला असता तर ही परिस्थिती कदाचित उद्भवली नसती. जसा आपला जीव आहे तसा या पक्षी प्राण्यांचा वृक्षांचाही जीव असतो. एखादा जीव आपण जगवू शकत नाही तर जगत असलेल्या जीवाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपण आपल्या घराजवळच एखादं झाड काही कारणास्तव पटकन तोडून टाकतो परंतु विचार करत नाही की हे झाड उगण्यासाठी किती वर्ष लागले. हे झाड किती प्राणी, पक्षी, कीटकांना जीवदान देतय. किती जीव या झाडावर अवलंबून आहेत. कृपया प्रत्येकाने अशी नैसर्गिक हानी करताना त्यापूर्वी विचार करावा आणि आपल्या निसर्गा साठी थोडं तरी योगदान देण्याचा प्रयत्न करावा. तरच आपला हा निसर्ग आपण वाचवू शकतो. पर्यायांन आपणही वाचू शकतो. नाहीतर या निसर्गा सोबत आपला ही अंत निश्चित आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.