आरोग्य व शिक्षण

अबब….३ तासात बनविल्या १२०० भाकरी!!

तीन तासात बाराशे भाकरी.

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे श्री हनुमान मंदिरच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, अखंड विनावादन,सकाळी ७ ते ९ वाजता ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ व रात्री ७ ते ९ वाजता हरिकिर्तन व नंतर जागर असतो.सप्ताहा काळात दररोज ग्रामस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते.विशेष म्हणजे सप्ताह काळात एकाही घरी चूल-गॅस पेटविला जात नाही.पूणे जिल्ह्यात सर्वांत मोठा अखंड हरिनाम सप्ताह म्हणून ओळखला जातो. बुधवार(दिः१९) सप्ताहाचा तीसरा दिवस आहे. या दिवशी दरवर्षी स्पेशल मेजवानी मासवडी या महाभोजनाचे आयोजन केले जाते.यावेळी गावातील सर्व महिला एकत्र जमून बाजरीच्या भाकरी तयार करतात.बुधवार ( दिः१९) रोजी या महिलांनी तीन तासात १२०० भाकरी बनविल्या यावेळी नंदा सुभाष बोत्रे, कमल विष्णू आदक, इंदूबाई हनुमंत आदक, संगिता फकिरा आदक व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेवटच्या टोकावर असणारे हे छोटेसे दुष्काळी गाव पण गावात असणार्या एकीमूळे आज २९ वर्षे हा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे.यासाठी अखंड हरिनाम सप्ताह मांदळेवाडी ग्रामस्थ दरवर्षी नियोजन करत असतात.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.