आरोग्य व शिक्षण

दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या ऊसाच्या शेतात आढळुन आली बिबट्याची पिल्ले!! सुखरूपपणे विसावली आईच्या कुशीत!!

दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची तीन पिल्ले सापडली त्यानी त्वरित वनविभागाशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली वनपरीक्षेत्र अधिकारी सौ कल्याणी गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्री अंकुश खरात व नानासाहेब चव्हाण यांच्या सोबत दौंड येथील ecoresq टीम घटनास्थळी दाखल झाली
ही पिल्ले खूप जस्त लहान असून एक मादी व दोन नर बिबट होते डोळेदेखील उघडले नसल्याने मादी बिबट जवळच असल्याचे लक्षात आले व सायंकाळी ५ वा सापडलेल्या ठिकाणी पुन्हा पिल्ले ठेऊन त्यावर ट्रैप कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आले सुमारे ६ वा सायंकाळच्या मावळत्या प्रकाशात मादी बिबट पहिल्या पिल्लाला सुखरुप घेऊन गेली असेच एक एक करुन तिनही पिल्ले आपल्या आईच्या कुशील गेली यावेळी resq टीम चे श्रेयस कांबळे, अनिकेत तुपे, डॉ.श्रीकांत देशमुख, प्रशांत कौलकर,विक्रांत बनकर, ऋषिकेश मोरे व वानकर्मचारी यांनी मोलाची मदत केली
नचिकेत अवधानी ( अध्यक्ष इको दौंड ) पिल्ले खूपच लहान होते एवढी लहान पिल्ले आई शिवाय जगणे शक्य नसल्याने त्याना त्यांच्या आई जवळ सोडणे फार महत्व्हाचे होते याचे महत्व शेतकरी संदीप शेंडगे याना सगितल्यावर त्यानी देखील सहकार्य केले आणि आई पासून दुरावलेली पिल्ले अखेर आई च्या कुशीत सुखरुप गेली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.