आरोग्य व शिक्षण

समर्थ शैक्षणिक संकुलात सातवाहन कालीन वस्तू प्रदर्शनाचे आयोजन!! प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न-बापूजी ताम्हाणे

समर्थ शैक्षणिक संकुलात सातवाहन कालीन वस्तू प्रदर्शनाचे आयोजन!!
प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न-बापूजी ताम्हाणे

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच सातवाहन कालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
जुन्नर परिसरातील प्राचीन इतिहास अभ्यासक,संशोधक आणि दुर्मिळ वस्तूचे संग्रहकार बापूजी ताम्हाणे यांनी संग्रहित करून ठेवलेल्या जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील पुरातन तसेच दुर्मिळ वस्तूचे प्रदर्शन समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (ता.जुन्नर ) येथे भरविण्यात आले होते.
जुन्नर परिसरातील प्राचीन इतिहास अभ्यासक-संशोधक,दुर्मिळ वस्तूचे संग्रहकार बापूजी ताम्हाणे यांनी जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील भाजलेल्या मातीची भांडी,महिलाचे अंलकार,आडव्या दांड्याचे जाते,शुभ चिन्ह असलेले चार पायाचे पाटे-वरवंटे,बाधकामातील वेगवेगळ्या प्रकारच्या विटा,लहान मुलांच्या खेळण्यातील हत्ती,घोडा,बैल तसेच लहान आकाराची चाके,औषधे,पातळ द्रंव पदार्थ पिण्यासाठी वापरत असलेलली भांडी,त्याचे तुटीची अवशेष,कर्णभूषणे,पँन्डल,पदक,काजल शलाका,त्याचबरोबर मध्ययुगीन काळातील अवशेष,जुन्नर चे हस्तलिखित कागद,मानपात्र,मूर्ती,रेशमी कापडावरील चित्रशैली इत्यादी हजारो पुरातन तसेच दुर्मिळ वस्तूचा खजिना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुला केलेला होता.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.हे पुरातन वस्तूचे प्रदर्शन पाहण्यासाठी संकुलातील इंजिनिअरिंग,एमबीए,पॉलिटेक्निक,फार्मसी,आयुर्वेदिक हॉस्पिटल,ज्युनिअर कॉलेज,आय टी आय,टोयोटा, टॅफे,गुरुकुल,बी सी एस,बी बी ए,एम सी एस,एम सी ए,ए डी एम एल टी,लॉ आदि महाविद्यालयातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
यावेळी बापूजी ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासातील साधने व उपयुक्तता यांची माहिती सांगितली.पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे दर्शन या प्रदर्शनातून दिसून येते.प्रदर्शनातील दुर्मिळ वस्तू व रंगसंगतीच्या अनुपम सौंदर्याने नटलेल्या,सजलेल्या वस्तू शतकतील दैनंदिन व्यवहार व संस्कृतीची ओळख करून देतात.विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि कुतुहलाने विचारलेल्या प्राचीन इतिहातील साधने यावरील विविध प्रश्नांची उत्तरे पुराव्या निशी बापूजी ताम्हाणे यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे,अध्यक्ष यश मस्करे,प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक डॉ.लहुजी गायकवाड,उपाध्यक्ष डॉ.राधाकृष्ण गायकवाड,लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,शिरीष भोर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.दिनेश जाधव आदि मान्यवरांनी भेट दिली.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.