आरोग्य व शिक्षण

समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत यश!! महाराष्ट्र व गुजरात मधून अंतिम फेरीत ३८ प्रकल्प!!

समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत यश!!
महाराष्ट्र व गुजरात मधून अंतिम फेरीत ३८ प्रकल्प!!

सिनॉप्सीस,अन्वेषण,सर्व शिक्षा अभियान आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन नुकतेच नेहरू तारांगण,वरळी मुंबई येथे करण्यात आले होते.शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील एज्युकेशन गॅप भरून काढण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या नवउपक्रमशीलतेला,नवनवीन कल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातून अंतिम फेरीमध्ये सुमारे ३८ प्रकल्पांची निवड करण्यात आलेली होती.त्यामध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथील समर्थ गुरुकुल मधील सार्थक आहेर व समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील अंतिम वर्षात शिकत असलेले प्रिया बांगर व गौरव गावडे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “शहरामधील कचऱ्याचे व्यवस्थापन” या प्रकल्पास एनकरेजमेंट अवॉर्ड मिळाल्याची माहिती प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली.
या प्रकल्पा अंतर्गत ई-कचरा,घनकचरा आणि सांडपाणी अशा तीन भागांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून शहरातील सर्व सांडपाण्याचे आउटलेट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प कार्यान्वित केला शकतो.विविध प्रकारचे टॅंक बसवून एका टॅंक मध्ये आलेले सांडपाणी,प्लास्टिक,कचरा व इतर काही घटक जाळीच्या साहाय्याने तळाशी गोळा केले जातात.नंतर सेटलमेंट टॅंक च्या साहाय्याने शिल्लक राहिलेले काही घटक तळाशी गोळा केले जातात.आणि त्यानंतर एरिएशन टॅंक मध्ये ऑक्सिजन ची मात्र वाढवून सूक्ष्म जीवांना पोषक असे वातावरण निर्मिती केली जाते.पुढील टॅंक मध्ये इफेक्टिव्ह मायक्रोम सोल्युशन च्या सहाय्याने विघटन प्रक्रिया पूर्ण केली जाते.आणि त्यानंतर हे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ शकते.
अल्ट्राव्हायोलेट ट्यूब चा वापर करून त्या पाण्यामध्ये असलेले कीटक जीव जंतू मारले जातात.आणि मग हे पाणी घरगुती वापरासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी वापरले जाऊ शकते.
त्याचप्रमाणे या कचरा व्यवस्थापनामध्ये ई-वेस्ट च्या माध्यमातून गोळा झालेला कचरा हा वेगवेगळा करून पुन्हा रिसायकलिंग किंवा पुनर्वापरासाठी केला जाऊ शकतो.
गोळा झालेला घनकचरा हा कन्वेनियर बेल्ट च्या साह्याने वेगवेगळा केला जातो.क्रशर च्या साह्याने बारीक केला जातो.शेवटी इफेक्टिव मायक्रोम सोल्युशन च्या साह्याने या कचऱ्याचे विघटन केले जाते.
या प्रकल्पाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासत कचऱ्याची विल्हेवाट यावर प्रभावी उपाययोजना राबविली जाऊ शकते असे प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी सदर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक रुपये ५ हजार,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, अभियांत्रिकीचे प्रा.निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.