लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मासिक बैठक मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न!!

लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मासिक बैठक मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न!!
लांडेवाडी(ता.आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मासिक बैठक मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक भागातील शिवसैनिकांशी संवाद साधून त्या त्या भागातील अडचणी व समस्या समजून घेतल्या.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली असून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. मुख्य म्हणजे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आलेल्या माझ्या शिवसैनिकाला शासकीय-प्रशासकीय पातळीवर हक्काची ताकद मिळाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आपापल्या गावातील लोकांची कामे व समस्या मार्गी लावण्यासाठी व त्याद्वारे नागरिकांचा उत्कर्ष साधण्यासाठी पुढाकार घ्यावा.प्रत्येक भागात तरुण कार्यकर्त्यांचे संघटन करावे असे आवाहन ही आढळराव पाटील यांनी सर्व शिवसैनिकांना केले.