सामाजिक

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण !!

1011734507

पंचनामा प्रतिनिधी – भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम, पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.

1011734508

भारत इतिहास संशोधक मंडळ गेल्या ११६ वर्षांपासून इतिहास संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. मंडळाकडे जतन केलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या माध्यमातून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा डिजिटायझेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज करण्यात आले.

या प्रकल्पामुळे www.bismarchives.in या संकेतस्थळावर दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती उपलब्ध होणार आहे. मंडळाकडे सुमारे तीन लाख कागदपत्रे असून, त्यांची सुमारे साडेसहा लाख पृष्ठप्रतिमा (इमेजेस) टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार ऐतिहासिक कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत.

यामध्ये बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते, ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे आणि दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. या माध्यमातून भारतीय इतिहासातील दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण माहिती जागतिक स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी सांगितले.

या डिजिटायझेशन प्रकल्पाचे काम चिन्मय भंडारी आणि मिथिलेश कुळकर्णी यांच्या न्यानसा कंपनीने माईंडस्केप हबच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. प्रकल्पासाठी मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांचेही सहकार्य लाभले आहे.

1011723388
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 409678
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 409680

Related posts

रणरणत्या उन्हात तिघांची सायकलवारी; माऊलींच्या पालखी मार्गाने प्रवास !!

Chief Editor

डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणेच्या विद्यार्थ्यांकडून जवळे (ता.आंबेगाव) गावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

Leave a Comment