सामाजिक

वळती-भागडी रस्त्यावर मध्यरात्री दगडांची अडथळे; लुटमारीच्या संशयाने परिसरात भीतीचे वातावरण !!

1011733824

निर्जन वनहद्दीत अज्ञातांकडून रस्ता अडविण्याचा प्रकार ; पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती ते भागडी या महत्त्वाच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी मोठमोठे दगड आडवे लावून रस्ता अडविल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता. १५) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. निर्जन वनहद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांसह शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनचालकांना अडवून लुटमारीच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भराडी गावातील दोन तरुण वैयक्तिक कामानिमित्त जुन्नर तालुक्यातील मंगरूळ-पारगाव मार्गे प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास ते वळती-भागडी रस्त्यावरील वनहद्दीतून जात असताना मुक्तादेवी मंदिराच्या पुढील काही अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे दगड आडवे लावलेले त्यांच्या निदर्शनास आले. अचानक समोर आलेला हा अडथळा पाहून त्यांनी प्रसंगावधान राखत वाहन थांबविले आणि परिसराची पाहणी केली. मात्र, अंधार आणि घनदाट वनक्षेत्रामुळे आजूबाजूला कोणीही आढळून आले नाही.

रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर अशा प्रकारे दगड लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यामागे नेमका काय उद्देश होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहनांना अडवून चालकांना लुटण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सुदैवाने या दोन्ही तरुणांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.

वनहद्दीतील निर्जन रस्ता बनतोय चिंतेचा विषय

वळती ते भागडी हा रस्ता परिसरातील नागरिक, शेतकरी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, या मार्गाचा काही भाग घनदाट वनक्षेत्रातून जात असल्याने रात्रीच्या वेळी येथे वर्दळ कमी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जंगल आणि अंधार असल्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी

या घटनेची स्थानिक पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यावर दगड लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घ्यावा, परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

1011723727
1011723355
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 409296

Related posts

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी ने संपादित केले उत्तुंग यश !!

Chief Editor

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन !!

Chief Editor

वननेस वन – निसर्गासोबत समरसता ; हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जन चळवळ !!

Chief Editor

Leave a Comment