सामाजिक

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी ने संपादित केले उत्तुंग यश !!

img 20251226 wa0835

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – जारकरवाडी (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत लांडेवाडी या ठिकाणी पार पडलेल्या तालूका स्तरीय क्रिडा स्पर्धेत तालुका स्थरावर उत्तुंग यश संपादन केले असून.शाळेला चॅम्पियन ट्रॉफी मिळाली असल्याची माहिती मुख्याध्यापक ए.जे.इनामदार यांनी दिली आहे.

इयत्ता पाचवी ते आठवी – लांब उडी व उंच उडी मुली-प्रथम क्रमांक-तृप्ती लबडे गोळा फेक-प्रथम क्रमांक व थाळी फेक व्दित्तीय क्रंमाक-सायली लबडे,शंभर मीटर धावणे मूली-व्दित्तीय क्रमांक-आकांक्षा जारकड. सांखिक मध्ये खोखो मुली प्रथम क्रमांक,खोखो मुले द्वितीय क्रमांक,आट्या पाट्या मुली प्रथम क्रमांक,आट्या पाट्या मुले व्दितीय क्रमांक

img 20251226 wa0835

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका,शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्याक्ष व सर्व सदस्य तसेच सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य,गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.

Related posts

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

Chief Editor

अंगणवाडीतील आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही ; सरकार ॲक्शन मोडमध्ये – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे कडक निर्देश !!

Chief Editor

नाते कलेचे माझ्या रक्ताशी ; अष्टपैलू कलावंत – कै.अमन तांबे

Chief Editor

Leave a Comment