सामाजिक

आंबेगाव पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीची वळसे पाटलांकडून पाहणी ; शिरदाळे, मांदळेवाडीत भयावह परिस्थिती !!

1011172153
1011172153

शेतकऱ्यांकडून उद्योग-व्यवसायाची मागणी !!

पंचनामा प्रतिनिधी – राज्यातील अनेक भागांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना आंबेगाव तालुक्याचा त्यातून समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी रविवारी (दि. ४) पूर्व भागातील गावांचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

या दौऱ्यात पहाडदरा, शिरदाळे, धामणी, लोणी, वडगावपीर आणि मांदळेवाडी या गावांचा समावेश होता. विशेषतः शिरदाळे व मांदळेवाडी परिसरातील परिस्थिती गंभीर असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. शिरदाळे येथे सोयाबीन, बटाटा तसेच अन्य पिकांची पाहणी करून वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शिरदाळे येथील शेतकऱ्यांनी शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग-व्यवसाय उभारण्याची मागणी केली. तसेच परिसरात एमआयडीसीसारखा प्रकल्प उभारल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. “आमच्याकडे कायमच दुष्काळ असतो, त्यामुळे हा दुष्काळ आमच्यासाठी नवीन नाही,” अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली.

दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, शासनाने या भागातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पाहणीदरम्यान महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही परिस्थितीची माहिती घेण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच मनोज तांबे, गणेश तांबे, उपसरपंच बिपिन चौधरी, माजी उपसरपंच मयुर सरडे, सोसायटी प्रतिनिधी जयदीप चौधरी, माजी सरपंच बाबाजी चौधरी, अनिकेत चौधरी, कल्पेश सरडे, ग्रामविकास अधिकारी सोनाली जाधव यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

1011080923

Related posts

माहुरगड किल्ला – इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत संगम !!

Chief Editor

लोककला परंपरेतील एक तेजस्वी आणि जाज्वल्य नाव – शाहीर रामदास गुंड

Chief Editor

कु.सुवर्णा बबन आव्हाड – एका चिमुरडीच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी !!

Chief Editor

Leave a Comment