सामाजिक

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी २८ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

1010298234

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६’ साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु असून इच्छुकांनी आपले अर्ज २८ जुलै २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी केले आहे.

शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. नामांकन अर्ज मंडळाच्या https://mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. उद्योगांची वृद्धी, उद्योगाला चालना, गती देण्यासाठी सन २०२३ पासून राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्काराअंतर्गत प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतात, असेही श्री. सुरुंग यांनी कळविले आहे.

1009850407

Related posts

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव ;जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ !!

Chief Editor

श्रावणी सोमवारनिमित्त जारकरवाडीत फराळ वाटपाचे आयोजन !!

Chief Editor

आधुनिक काळातही तेवत आहे लोकपरंपरेचा दीप ; आखाडी उत्सवातून जपली जाते शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment